पंतप्रधान नरेंद्र मोदी काल गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागपूरात होते. निमित्त होते माधव नेत्रायलयाच्या इमारतीच्या भूमीपूजनाचे. पंतप्रधान पदावर पोहोचलेला एक संघाचा स्वयंसेवक एका कार्यक्रमानिमित्त आपल्या मातृसंघटनेच्या मुख्यालयात गेला. ही घटना महत्वाची, असली तरी आश्चर्यकारक निश्चितपणे नाही. परंतु काही लोकांनी या भेटीला आश्चर्यकारक बनवण्याचा प्रयत्न मात्र केला. काहींनी त्याचा संबंध काहींनी मोदींच्या चौथ्या टर्मशी जोडला. काही लोकांनी त्यांच्या निवृत्तीची चर्चा सुरू केली. संघ गेली शंभर वर्षे देशात काम करतोय. अनेक जण असे आहेत, ज्यांची हयात संघाला शिव्या देण्यात गेली. परंतु त्यांना संघ काय हे मात्र कळले नाही