लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान काल सोमवारी पार पडले. या टप्प्यात महाराष्ट्रात ईव्हीएम मशीनचा वेग जाणीवपूर्वक कमी करण्यात आला. पराभवाची खात्री झाल्यामुळे मतदान यंत्रणा बिघडवल्याचा आरोप उबाठा शिवसेनेने केलेला आहे. रोज उठून एक नवा आरोप करण्याच्या शिरस्त्यामुळे मुळात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे आरोप कोणीही फार गांभीर्याने घेत नाही. तरीही हा विषय मतदानाच्या संदर्भात असल्यामुळे त्यांच्या ताज्या आरोपा मागचे सत्य समोर येणे गरजेचे आहे.