‘दा विंची कोड’, ही डॅन ब्राऊन लिखित अप्रतिम रहस्यमय कादंबरी. संपूर्ण कथानकात एका रहस्याचा छडा लावण्यासाठी नायक-नायिका धावत असतात. अखेर जेव्हा रहस्य हाती लागते तेव्हा नायक जाहीर करतो, ‘हे रहस्य आपण जगासमोर कधीच आणायचे नाही, कारण वेगवेगळ्या प्रतिमांमध्ये ते आधीच उघड झाले आहे.’ महाराष्ट्रात भ्रष्ट कारवायांच्या खोदकामाकडे पाहील्यानंतर कायम ‘दा विंची कोड’ची आठवण येते. सगळी रहस्य शोधायची, परंतु पूर्णपणे धसास लावायची नाहीत. कोविडच्या काळातील आणखी एक भानगड उघड झाली आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी उत्तर भारतीयांचे मीठ खाल्ल्याचा हा प्रकार. त्याचे धागेदोरे थेट मातोश्रीपर्यंत जातायत. आता या प्रकरणाचे काय होणार याची वाट पाहायची.