महायुती म्हणून आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल हे तिन्ही पक्ष आपण आगामी विधानसभा निवडणूक एकत्रित लढणार असल्याचे जाहीर करत असताना कोणतरी एखादा आमदार वेगळा विचार करण्याची भूमिका मांडत असेल तर अशा मिठाचा खडा टाकणाऱ्या आमदारांना, नेत्यांना वेळीच आवर घालण्याची आवश्यकता असते. अन्यथा या सगळ्या संभ्रमाचा फायदा हा विरोधी पक्षांना होऊ शकतो याचं भान महायुती मधल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. राजकारणात मुरलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे यांनी या गोष्टीचा गांभीर्य ओळखून त्यांच्या पक्षाचे पहिल्यांदाच आणि ते पण विधान परिषदेवर म्हणजे मागच्या दाराने आमदार झालेले अमोल मिटकरी यांना योग्य ते खडे बोल आज सुनावून बोल घेवडे पणा करणाऱ्यांना योग्य तो संदेश दिलेला आहे.