उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये सध्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार असल्यामुळे तिथला गुंडाराज हा संपवण्यात बऱ्यापैकी योग्य आदित्यनाथ यांना यश आलेलं आहे. मात्र आज पश्चिम बंगालची परिस्थिती इतकी विदारक आणि भयानक आहे की आजच्या तारखेला पश्चिम बंगाल मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल हेच सुरक्षित नाहीत असं चित्र निर्माण झालेलं आहे. नुकताच राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांनी याबद्दल माहिती सुद्धा दिलेली आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये राज्य आहे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचं.