रिसर्च फर्मच्या अहवालामुळे अदाणी समुहाला दिलेल्या हादऱ्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही तडे जातील असा अंदाज भारतातील काही विघ्नसंतोषी व्यक्त करतायत. परंतु जग मात्र भारताकडे अपेक्षेने पाहाते आहे. जगावर मंदीचे सावट असताना भारतीय अर्थव्यवस्था हा आशेचा किरण आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आय़एमएफच्या ताज्या अहवालात म्हटलेले आहे. भारताचा विकास दर २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६.९ टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.