भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये, पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी म्हणजेच २४ नोव्हेंबरला एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालामधील आकडेवारीनुसार भारतात दर १ हजार पुरुषांमागे १ हजार २० महिला आहेत. ही भारतासाठी, समाजासाठी एक सकारात्मक बाब आहे. पण मुलींची संख्या वाढण्यामागाची कारणे काय असू शकतील हे जाणून घेऊयात.