मुहूर्त जवळ येतोय एका षडयंत्रावरून पडदा उठण्याचा..

मुहूर्त जवळ येतोय एका षडयंत्रावरून पडदा उठण्याचा...| Dinesh Kanji | 26/11 Attack | Tahawwur Rana |

हू किल्ड करकरे… हे पुस्तक २००९ साली प्रकाशित झाले. लेखक होते, माजी आयपीएस अधिकारी एस.एम.मुश्रीफ. कधी काळी ज्यांचे नाव तेलगी घोटाळ्यात होते. २६/११ रोजी मुंबईवर झालेला हल्ला हा फक्त लष्कर ए तोयबाने केलेला हल्ला नसून त्यात आरएसएसचाही हात होता, असा दावा या पुस्तकात करण्यात आला होता. योगायोगाने त्याच वर्षी देशाचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ‘हिंदू टेररीझम’ या शब्दाचा वापर केला होता. काँग्रेस आणि काँग्रेसी इको सिस्टीमचे गेल्या २५ वर्षांतील हे सगळ्यात मोठे षडयंत्र होते. या षडयंत्रावरून प़डदा उठण्याची वेळ आता आलेली आहे. कारण दहशतवादी तहव्वूर राणा याची रवानगी लवकरच अमेरीकेतून भारतात होते आहे.

Exit mobile version