बांगलादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू आहेत. भारतात बांगलादेशी आणि रोहिंगे मतदार बनून बसले आहेत. रोहींग्या बांगलादेशींना हुसकावले नाही तर इथे सुद्धा ते संख्या वाढवून डोक्याला ताप करणार ही बाब स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपाने यावर आक्रमक भूमिका घेतलेली दिसते. भाजपा नेते किरीट सोमय्या आणि नीतेश राणे यांनी बांगलादेशी घुसखोरांचा विषय उचलून धरला आहे. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे खरे तर यावरून राजकारण होऊ नये, मात्र तशी सुतराम शक्यता नाही. मतपेढीचे राजकारण करणारे पक्ष यात कोलदांडा घालणार हे निश्चित. सध्या दोन दगडांवर पाय ठेवणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाची याबाबत काय भूमिका आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.