मिठी साफ करता आली नाही, ते मोदींना प्रश्न विचारतायत…

मिठी साफ करता आली नाही, ते मोदींना प्रश्न विचारतायत... | Dinesh Kanji | Uddhav Thackeray |

स्वत: बद्दल सांगण्यासारखं फारसं काही उरलेले नसते तेव्हा तुम्हाला संपूर्ण मॅरेथॉन मुलाखत दुसऱ्याच्या नावाने बोटं मोडण्यात खर्ची घालावी लागते. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदी आणि २५ वर्ष महापालिकेत सत्ताधारी राहीलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्या यश कथा नाहीत. यांच्या डोळ्या देखत कलानगर शेजारी चार मजली झोपड्या उभ्या राहील्या. त्या साफ करायला जमले नाही, तरीही हे इतरांना प्रश्न विचारतायत. सत्ता गेल्यापासून देश आणि लोकशाहीच्या नावाने गळे काढायचे, कपाळ बडवायचे एकमेव कार्यक्रम ते सातत्याने राबवतायत. शिउबाठा पुरस्कृत ‘आवाज कुणाचा’ हा पॉडकास्ट त्याचे ताजे उदाहरण आहे.

Exit mobile version