महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान केला यावरून गेल्या काही काळात महाराष्ट्रात प्रचंड धुरळा उडाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर सातत्याने चिखलफेक केली. पण मुंबई उच्च न्यायालयाने भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान केला नाही, हे स्पष्ट करत या सगळ्या नेत्यांची तोंडेच बंद केली.