वक्फ सुधारणा विधेयकावर आज संसदेत चर्चा सुरू झाली. येत्या दोन दिवसांत ते मंजूर होईल अशी शक्यता आहे. भाजपाचा हा निश्चितपणे प्रचंड मोठा असा राजकीय विजय असेल. मतदारांना दिलेले आणखी एक महत्वाचे वचन पूर्ण करण्याच्या दिशेने सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. अर्थात हा विजय परीपूर्ण नाही. ज्येष्ठ विधीज्ञ विष्णू शंकर जैन यांनी या विधेयकासाठी मोठा लढा दिला. वक्फ सुधारणा विधेयक बरेच सौम्य करण्यात आल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. याबाबत नाराजी व्यक्त करून त्यांनी विधेयकाला १० पैकी केवळ २ गुण दिले आहेत. आघाडी सरकारच्या स्वभावधर्मामुळे या विधेयकातील काही तरतुदी सौम्य करण्यात आल्या, ही बाब सत्य आहे. वक्फ विधेयका संदर्भातील घडामोडी पाहील्यानंतर भाजपा समर्थकांना आता लक्षात येत असेल की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४०० पार… चे लक्ष्य का ठेवले होते