म्हणून महाराष्ट्र म्हणतोय, बरे झाले ठाकरे सरकार गेले…

म्हणून महाराष्ट्र म्हणतोय, बरे झाले ठाकरे सरकार गेले... | Dinesh Kanji | Uddhav Thackeray | MUTP 3A

‘बुलेट ट्रेनचा फायदा महाराष्ट्रापेक्षा गुजरातला आहे’, असा दावा करून महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पाला बत्ती लावली. परंतु सर्वसामान्य मुंबईकरासाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या लोकल रेल्वेच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पात सुद्धा ठाकरे सरकार अडसर बनले होते. हे झारीतील शुक्राचार्य गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने सुमारे ३३,६९० कोटी खर्चाच्या मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजक्ट (एमयूटीपी) ३ ए, प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला. मुंबईकरांना हा प्रचंड मोठा दिलासा आहे.

Exit mobile version