गाव ते देश पातळीपर्यंत भाजपाची सत्ता हवी, असा संदेश भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिर्डी येथील भाजपाच्या महाविजय अधिवेशनात कार्यकर्त्यांना दिला. गेली काही वर्षे भाजपाची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. एकेका राज्यात सत्ता मिळवायची आणि टीकवायची हा प्रयोग भाजपाने यशस्वीपणे केला आहे. गुजरात, मध्यप्रदेश, आसाम, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरीयाणा या राज्यात भाजपाने सातत्याने सत्ता हाती ठेवण्यात यश मिळवले आहे. विरोधकांचा सुपडा साफ करत आणला आहे. महाराष्ट्राचाही या यादीत समावेश होणार अशी चिन्ह आहेत. पवार-ठाकरेंचे दगाफटक्याचे राजकारण २० फूट खोल गाडले, या अमित शहा यांच्या विधानाकडे याच कोनातून पाहीले पाहीजे. कारण इतक्या खोलवर गाडलेले डोके वर काढत नाही.