महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आणखी एक प्रताप अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यामुळे उघड होण्याची शक्यता आहे. अमरावतीत झालेल्या उमेश कोल्हेप्रकरणात पोलिसांना उद्धव ठाकरे यांनी फोन केले होते. त्यामुळे दबावाखाली पोलिसांनी मुस्लीम कट्टरतावादामुळे झालेल्या कोल्हे यांच्या हत्येला दरोड्याचा रंग देण्याचा प्रयत्न केला असा थेट आरोप राणा यांनी केला आहे.