अलिकडेच उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा संपन्न झाला. त्याच दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरेंनी मॅडम सोनिया आणि राहुल गांधी यांचे पाय धुतले पाहीजेत, असे वक्तव्य केले. ठाकरेंनी ते मनावर घेतले की नाही ठाऊक नाही, परंतु त्यांच्या दिल्ली दौऱ्यात गाठीभेटींच्या पलिकडे विशेष काही झाले नाही, मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर सोनियांची मोहर काही उमटली नाही. आता मविआचे रिमोट कंट्रोल शरद पवार यांनीही ठाकरेंच्या स्वप्नाला टाचणी लावल्याचे दिसते.