ऐशीच्या दशकात पंतप्रधान राजीव गांधी यांनी सत्तेच्या धुंदीत व्ही.पी.सिंह यांना दुखावण्याची चूक केली. त्या चूकीनंतर नेहरु गांधी घराणे आणि पंतप्रधान पदाचा संबंध संपला. महाराष्ट्रात याच चूकीची पुनरावृत्ती उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसी येथील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकल्यानंतर का कोण जाणे व्ही.पी.सिंह यांची आठवण आली.