प्रेक्षकांनी नाकारलेला आदर्शवादी सिनेमा ‘तेरे मेरे सपने’

प्रेक्षकांनी नाकारलेला आदर्शवादी सिनेमा 'तेरे मेरे सपने'

विजय आनंद यांनी चित्रपट सृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. गाईड, जॉनी मेरा नाम, तिसरी मंजिल, ज्वेल थीफ, नो दो ग्यारह यासारखे अनेक चित्रपट विजय आनंद यांनी प्रेक्षकांच्या समोर ठेवले आणि प्रेक्षकांनी त्या चित्रपटांना भरपूर प्रेमही दिलं. पण प्रत्येक दिग्दर्शकाच्या करियरमध्ये एक असा चित्रपट येतो की जो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही आणि असाच एक चित्रपट म्हणजे ‘तेरे मेरे सपने’. १८ जून १९७१ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात देव आनंद, मुमताज, हेमा मालिनी आणि प्रेमनाथ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पण हा चित्रपट गीत संगीतासाठी आजही लोकप्रिय आहे. जीवन की बगीया महेके गी, एक मैंने कसम ली एक तुने कसम ली, जैसे राधा ने माला जपी प्यार की ही गाणी या चित्रपटाची ओळख झाली. एक आदर्शवादी सिनेमा म्हणून विजय आनंद यांनी हा सिनेमा लोकांसमोर ठेवला पण यातला आदर्शवाद हा लोकांच्या पचनी पडला नाही आणि यश संपादन करण्यात हा सिनेमा मागे पडला.

Exit mobile version