मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे. या जुन्या चाळी जाऊन तिथे नव्या इमारती उभ्या राहतील. पण या नव्या इमारतींचा पायाही रचला नाही तोपर्यंत त्यांचे नामकरण करण्यात आल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी आणि आश्चर्यही आहे. एकूण काय तर बाळ जन्मलेही नाही पण त्याचे बारसे उरकण्यात आले आहे.