राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार युक्रेनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला देतायत. तेथील विद्यार्थ्यांबाबत चिंता व्यक्त करतात. पंढरपूर येथे झालेल्या सुरज जाधवच्या आत्महत्येबाबत बोलत नाहीत. राज्यात 90 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु पवार त्यावर एक शब्द बोलत नाही. सूरज जाधव इतका दुर्दैवी ठरला की त्याच्या आत्महत्येवर पवारांसह ठाकरे सरकारचे नेते मौन आहेत. हे मौन ठाकरे सरकारच्या निर्ढावलेपणाचे लक्षण आहे. शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी सुरज जाधववर बोलावं, शेतकऱ्यांच्या हलाखीवर बोलावं, लवासातील घपल्यावर बोलावं. Editor-in-cheif – Dinesh Kanji