सोनिया ISI च्या एजण्ट नाहीत ; मग, केजीबीच्या आहेत का ?

सोनिया ISI च्या एजण्ट नाहीत ; मग, केजीबीच्या आहेत का ? | Dinesh Kanji | Sonia Gandhi | Subramanian S

काँग्रेसवाल्यांचे राजकारण कळण्याच्या पलिकडचे असते. बांगलादेशी पत्रकार आणि वीकली ब्लिट्झचा संपादक सलाह उद्दीन शोएब चौधरी याने हेदविग एण्टोनिया अल्बानिया माईनो उर्फ सोनिया गांधी यांच्या पूर्वायुष्यावर खळबळजनक लेख लिहीला. त्या आयएसआयच्या डीप स्टेट असल्याचा आरोप केला. त्यामुळे खवळलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चौधरी विरुद्ध बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. तो भारतात नसल्यामुळे त्याच्या विरोधात कारवाई कोण करणार आणि कशी करणार हा प्रश्न अनुत्तरीत आहेच. सोनिया गांधी या केजीबीच्या एजण्ट आहेत, या आरोपाचे काय? हा आरोप काँग्रेसला मान्य आहे का? हा आरोप डॉ.सुब्रमण्यम स्वामी गेली अनेक वर्षे करीत आहेत. परंतु त्या विरुद्ध काँग्रेसने साधा निषेधही केलेला नाही.

Exit mobile version