सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहून एकेकाळी दूरदर्शनवर प्रचंड लोकप्रिय झालेल्या चाणक्य मालिकेतील काही प्रसंग आठवले. मगध सम्राट धनानंदचे सिंहासन अस्थिर होते. कुटुंबात जोरदार सत्तासंघर्ष सुरू असतो. हा संघर्ष संपवण्यासाठी सम्राट राजीनामा देऊन नव्या पिढीचा मार्ग मोकळा करण्याचा विचार करतो. बौध्द भंते जीवसिद्धी यांच्या सूचनेवरून धननंद या निर्णयाप्रत आलेला असतो. राज्याचा कारभार राजपुत्राच्या हाती सोपवून वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याची घोषणा करतो. धननंदचा विश्वासू अमात्य कात्यायन उर्फ राक्षस याचेही या प्रस्तावाला समर्थन असते. प्रत्यक्षात हाच निर्णय मगध साम्राज्याचा मूळावर येतो. मगधमध्ये सत्तांतर होते.