काही काही चित्रपट काळ कितीही पुढे सरकला तरी आपल्याबद्लचे आकर्षण कायम ठेवतात. यश चोप्रा दिग्दर्शित “सिलसिला” हा बहुचर्चित चित्रपट अगदी असाच आहे. मुहूर्तापासूनच तो गाजला. अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांच्या व्यक्तिरेखांभोवती विलक्षण रोमॅन्टीक नाट्य असलेल्या या म्युझिकल हिट चित्रपटाची गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटाला ४० वर्षे पूर्ण होत आहेत.