संसदेमध्ये भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जात विचारल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना प्रचंड संताप आलेला आहे. त्यांना हा जातीचा, संविधानाचा आणि संसदेचाही अपमान वाटला. आव्हाडांना असे का वाटले ते काही कळायला मार्ग नाही. राहुल गांधी जिथे तिथे जातीची चौकशी करत फिरतात. कौन जात हो, असा सवाल करीत असतात. संसद सुद्धा याला अपवाद नाही. मग तोच प्रश्न राहुल गांधींना केला तर तो त्यांना त्यांच्या समर्थकांना झोंबण्याचे कारण काय? स्वत:च्या जात आणि धर्माबाबत इतकी संदीग्धता बाळगण्याचे गांधी-वाड्रा परीवाराला कारण काय ?