दोन महीन्यांपूर्वी नवी दिल्लीत झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक विधान केले होते. मोदी की गारंटी… या घोषणेची अवस्था २००४ मध्ये भाजपाने दिलेल्या इंडीया शायनिंग… या घोषणेसारखी होईल असे भाकीत त्यांनी केले होते. काँग्रेसला हीच एकमेव आशा आहे, ज्याच्या बळावर हा पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची स्वप्न बघतो आहे. परंतु ही आशा प्रत्यक्षात येण्याची शक्यता तिळभर सुद्धा नाही. त्याचे मूळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीत दडलेले आहे..