वर्ष होतं १९९३. दिवस होता १२ मार्च. याच दिवशी मुंबई बारा बॉम्बस्फोटांनी हादरली. आज या दिवसाला ३० वर्षे पूर्ण होताहेत. त्या जखमा आजही मुंबईकर विसरलेला नाही. आजही त्या ताज्या आहेत. कित्येक कुटुंब उद्धवस्त झाली. या साखळी बॉम्बस्फोटात तुषार देशमुख यांनी आपली आई गमावली आहे. आईच्या जाण्याचं दुःख किती मोठे आहे, हे आपण जाणतोच. ३० वर्षानंतरही ती भळभळती जखम अजूनही ताजी आहे. तर आपण गाठीभेटी कार्यक्रमात तुषार प्रिती देशमुख यांच्याशी बोलून त्यांच्या वेदना जाणून घेऊया.