पापूआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मापारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडले. शिउबाठाचे नेते संजय राऊत मात्र याचे कौतूक नाही. एका छोट्याशा जादूटोणेवाल्या देशाचा पंतप्रधान मोदींच्या पाया पडला त्यात काय विशेष? क्वाड देशांच्या बैठकीत जागतिक महासत्ता असलेल्या अमेरीकेचे अध्यक्ष जो बायडन, यांना मोदींची स्वाक्षरी घेण्याची इच्छा झाली, त्याचेही राऊतांना कौतूक असण्याचे कारण नाही. मोदींच्या नजरेला पापुआ न्यू गिनीचे लष्करी महत्व दिसते, तिथली खनिज श्रीमंती दिसते, देशाचा फायदा दिसतो. राऊतांना तिथला जादूटोणा दिसतो. हा ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनातील फरक आहे.