काही लोक वाद ओढवून घेत असतात, काही लोकांना वाद येऊन येऊन चिकटत असतात. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यापैकी दुसऱ्या गटातील आहेत. नार्कोटीक ब्युरोचे झोनल डायरेक्टर असताना वानखेडे यांच्या विरोधात मविआचे मंत्री नबाव मलिक, खासदार संजय राऊत यांनी आघाडी उघडली होती. त्या काळात वानखेडे यांची बरीच होरपळ झाली. आता दिशा सालियन प्रकरणानिमित्त ते पुन्हा प्रकाश झोतात आलेले आहेत. आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्या एकमेकांशी झालेल्या संवादाचे पुरावे वानखेडे यांच्याकडे असल्याचा दावा एड.नीलेश ओझा यांनी केला आहे. एड.ओझा हे दिशाचे वडील सतीश सालियन यांचे वकील आहेत. याप्रकरणात समीर वानखेडे यांच्या वकीलांनी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.