आपल्या देशात सोन्याचं खूप महत्व आहे. मात्र लोकांप्रमाणेच बँकांचा देखील सोनं खरेदीकडे कल वाढलाय. भारताची मध्यवर्ती आणि महत्वाची बँक ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये तब्बल ६५ टन सोन खरेदी केलंय. सोन्यासंदर्भातच अजून एक अहवाल समोर आलाय ज्यामध्ये भारतातील महिलांकडे जगाच्या तुलनेत ११ टक्के सोन आहे.