पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे एक वैशिष्ट्य आहे. ते विधीमंडळात कमी आणि पत्रकारांच्या कॅमेरासमोर जास्त बडबड करत असतात. सभागृहातील कामकाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठाकरे पितापुत्रांबाबत पत्रकारही फारशी चर्चा करताना दिसत नाही. ठाकरे पिता-पुत्रांनी विधीमंडळात कोणते मुद्दे उठवले यापेक्षा ते आले, त्यांनी अमक्याकडे पाहीले, तमक्याकडे दुर्लक्ष केले, ढमक्याशी हस्तांदोलन केले, अशा प्रकारच्या बातम्या देण्याचे काम पत्रकार मंडळी करत असतात. सभागृहात फिरकायचे नाही आणि वर ‘आम्हाला सभागृहात बोलू दिले जात नाही’, असा कांगावा आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते करत असतात. त्याच आदित्य ठाकरे यांने पितळ उघडे पाडण्याचे काम भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी अधिवेशनादरम्यान केले.