वर्षभरात सहाव्यांदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्रातील महायुती सरकार त्यांची दखल घेत नाही, अशा प्रकारचा आरोप केला जातो आहे. ओबीसी कोट्याला धक्का लावणार नाही, असे सरकारचे नेते उपोषणा दरम्यानही सांगत आहेत. याबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणतीली संदीग्धता नाही. त्यामुळे जरांगेच्या उपोषणाचे लाभार्थी असलेल्या विरोधकांनी तरी त्यांची भेट घेऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ असे आश्वासन द्यावे. त्यांना ज्यूस पाजावा आणि त्यांचे उपोषण सोडवावे. माजी खासदार संभाजी राजे जरांगेच्या प्रकृतीमुळे प्रचंड चिंतातूर झाले आहेत, त्यांनी विरोधकांवर उपोषणाच्या मुद्द्यावरून घणाघात केलेला आहे.