चित्रपटसृष्टीच्या इतिहासाकडे पाहिलं तर मुंबईचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. मुंबईने आजपर्यंत अनेक तारे तारका पहिल्या आहेत. प्रत्येकाचं यशापयश पाहिलं आहे. चित्रपटसृष्टी वाढवण्यात जेवढा वाटा या नट नट्यांचा आहे तेवढाच हातभार आहे चित्रपटगृहांचा. अनेक सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांनी सुवर्ण काळ पाहिला आहे. पण आता सिंगल स्क्रीन चित्रपटगृह जवळ जवळ बंद झालेली आहेत आणि त्यातल्याच एका सिनेमा थिएटरला उजाळा दिला आहे. पाहा अप्सरा थिएटरच्या आठवणी.