चित्रपट हे वेगवेगळ्या धाटणीचे, विषयांचे, आशयाचे आणि शैलीचे असतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे ‘हिस्टोरिकल फँटसि’. या चित्रपटांचे वैशिष्टय म्हणजे यातले अस्तित्वात नसलेलं राज्य , शहर, राजे, महाराणी, माणसं, श्रीमंती, गरिबी. यातल्या कशाचाच वास्तवाशी संबंध नसतो. हा इतिहास कुठे घडला, हे सगळे कुठे असतं याची उत्तर कधीच मिळाली नाहीत आणि आपण शोधायलाही जात नाही. असाच एक चित्रपट म्हणजे ‘राजकुमार’ पण हा शम्मी कपूरचा राजकुमार नाही. या राजकुमारचा शम्मी कपूरच्या राजकुमारशी काहीही संबंध नाही. या चित्रपटात अनिल कपूर, माधुरी दीक्षित, नसिरुद्दीन शाह या कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटाला आज २५ वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच निम्मिताने जेष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनी ‘राजकुमार’ चित्रपटावर टाकलेला हा ‘टॉप फोकस’