लॉकडाऊन मध्ये सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की वेळ कसा घालवायचा आणि मुळात काय करायचं तसाच प्रश्न टकाटक फेम प्रणाली भालेरावला सुद्धा पडला. टकाटक मुळे प्रकाश झोतात आलेली प्रणाली भालेराव आता टकाटक २ मधेही आपल्याला दिसणार आहे. लॉकडाऊन मध्ये तिने काय केले, कशाप्रकारे हा वेळ घालवला त्याचबरोबर सिनेमा, वेब सिरीजच्या ज्या ऑफर्स आल्या, त्यातल्या सगळ्याच ऑफर्स तिने स्विकारल्या की अजून काही? या सगळ्याबद्दल प्रणाली भालेराव हिने न्यूज डंकाच्या फिल्मी अदा या खास कार्यक्रमामधून सांगितलं आहे.