देशाने आज ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी ८६ मिनिटांचे तडाखेबंद भाषण केले. केंद्र सरकारच्या कामकाजाचा ताळेबंद मांडला. भाषणातून भारताच्या सुवर्णमयी भविष्यकाळाचे चित्र उभे केले. त्या दिशेने कशाप्रकारे पुढे जाता येईल याबाबत मार्गदर्शन केले. पुढच्या स्वातंत्र्य दिनी मी आपल्यासमोर देशाच्या प्रगतीचा, पूर्ण झालेल्या संकल्पांचा लेखाजोखा मांडेन, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. विरोधकांना हा आत्मविश्वास फारसा रुचलेला दिसत नाही.