महाविकास आघाडी ही सोयीची सोयरीक होती. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि ही सोय संपली. त्यामुळे सोयरीकही कधी तरी संपणार आहे. मविआचा कारभार आटोपत असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची रोज सकाळ-संध्याकाळ सालटी निघणार ही बाब मात्र स्पष्ट झालेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या घरबसल्या घोडचुकांचे वाभाडे आजवर विरोधक काढत होते, आता घरातील लोकही काढू लागलेत. सुरूवात ठाकरेंचे सर्वात मोठे पाठीराखे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. फारसे लोक सांगाती उरले नसल्याचे हे परीणाम.