‘हिंदू दहशतवादा’चे पितृत्व पवारांचेच,ले.कर्नल पुरोहीतांचा गौप्यस्फोट…

'हिंदू दहशतवादा'चे पितृत्व पवारांचेच,ले.कर्नल पुरोहीतांचा गौप्यस्फोट...| Dinesh Kanji | Sharad Pawar

हिंदू दहशतवाद या शब्दाचा वापर सर्वात आधी कोणी केला याचा गौप्यस्फोट कर्नल प्रसाद पुरोहीत यांनी केलेला आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला. ठिक एक महीना आधी, म्हणजे ऑगस्ट महीन्यात शरद पवारांनी देशात फक्त मुस्लीम दहशतवाद नसून हिंदू दहशतवाद अस्तित्वात असल्याचा दावा अलिबागमध्ये पक्षाच्या मेळाव्यात केला होता. पवारांच्या या वक्तव्यानंतर मालेगावात बॉम्बस्फोट व्हावा आणि हिंदू संघटनांशी संबंधित व्यक्तिंना त्यात गोवण्यात यावे हा निश्चितपणे योगायोग नाही.

Exit mobile version