निवडून येणाऱ्या कुठल्याही राजकीय नेत्याची खरी ताकद ही कशात असते तर त्या नेत्याला मिळणाऱ्या मताधिक्यामध्ये ती ताकद असते. कुणाला किती मताधिक्य मिळतं, यावरच साधारण राजकारणामध्ये त्यांच्या लोकप्रियतेच मूल्यमापन होत असतं. काल झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बारकाईने बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचं मताधिक्य हे मोठ्या प्रमाणावर घसरलेले आहे.