लोकसभा निवडणुकीत सगळ्यात मोठी धमाल सांगली मतदार संघातून झाली होती. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी एकाच वेळी महायुती आणि मविआला धक्का दिला होता. विजयी झाल्यावर त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. ४ जून २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. जेमतेम ९९ जागा जिंकलेल्या काँग्रेस पक्षाला सत्तेची स्वप्न पडू लागली होती. ती झिंग आता उतरली असून काँग्रेस आणि काँग्रेसशी संबंधित नेत्यांचे पाय जमीनीवर आल्याचे संकेत मिळू लागले आहेत. विशाल पाटलांना आता मंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत. विशाल पाटील हे एकांडे नाहीत, भाजपाकडे आशेने पाहणाऱ्यांची गर्दी आहे.