एक जमाना असा होता जेव्हा फाटलेले कपडे घालणे हे गरिबीचं लक्षण मानलं जायचं, पण आता या २१ व्या शतकात कधी कोणती फॅशन किंवा ट्रेंड येईल सांगता येत नाही. आत्ताच्या फॅशनच्या दुनियेत कोणतीही वस्तू विकली जातेय. मग ते फाटलेले कपडे असो किंवा आणि दुसरं काय. पण सध्याची फॅशनची व्याख्याच बदलली आहे. आता याच पाश्चिमात्य फॅशनच्या दुनियेत फाटक्या शूजला सुद्धा चांगले दिवस आलेत. फाटलेल्या शूजची किंमत लोक तब्बल लाखात मोजायला तयार आहेत.