भावनिक भाषणांच्या चर्चेत दुर्लक्षित झालेला विषय

भावनिक भाषणांच्या चर्चेत दुर्लक्षित झालेला विषय

मंगळवारी राज्यसभेत काश्मीरच्या चार खासदारांचा निरोप समारंभ पार पडला. या प्रसंगी संसदेत बोलताना पंप्रधान मोदी भावुक झाले आणि त्यांनी विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांना सलाम केला. या प्रसंगाची बातमी सर्वत्र झाली पण या बातम्यांमध्ये एक महत्वाचा विषय फार चर्चिला गेला नाही. त्यावरच प्रकाश टाकण्याचा प्रयत्न ‘न्यूज डंका’ ने या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. तो विषय म्हणजे मोदी सरकारचे काश्मीर धोरण!

९ फेब्रुवारीच्या मंगळवारी भारतीय संसदेत एक खूप वेगळेच चित्र पाहायला मिळाले. जिथे कायम सत्ताधारी आणि विरोधक गंभीर चर्चा आणि वादविवाद करत असतात तिथले वातावरण खूपच भावनिक झाले होते. यात पिडीपी पक्षाचे खासदार मीर मोहम्मद फैझ पण होते. संसदेतील आपला शेवटचे भाषण करताना मोदी सरकारचे त्यांच्या काश्मीर धोरणाबद्दल प्रचंड कौतुक केले. मोदी सरकारच्या काळात काश्मीरला निधी जास्त मिळाला, जनतेला अनेक योजनांचा लाभ जाहला असे सांगत जाहीर कौतुक पिडीपी खासदाराने केले.

मोदी सरकारने फक्त कलम ३७० हटवला नाही तर काश्मीरच्या खोऱ्यात विकासाची गंगा नेली. त्याचाच परिणाम असा आहे की आज विरोधी पक्षाचे खासदार पण मोदींच्या कामाचे जाहीर कौतुक करत आहेत.  

 

Exit mobile version