लोकसभेच्या मतदानाचा सहावा टप्पा आज पार पडला. २०१९ च्या तुलनेत मतदानाचा टक्का कमी झालेला आहे. परंतु ही घसरण किरकोळ आहे. तिसऱ्यांदा देशात भाजपाची सत्ता येणार असे ठोकताळे मांडले जात असताना जे काही मुद्दे मांडले जात आहेत, त्यात अनेक महत्वाचे मुद्दे निसटून जातायत. गेल्या दशकभराच्या काळात शेअर मार्केटमध्ये वाढलेली डीमॅट अकाऊंट हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. देशातील डीमॅट अकाऊंटच्या संख्येत यंदाच्या वर्षी ३ कोटी ७० लाख खात्यांची भर पडली असून हा आकडा १५ कोटींच्या पुढे सरकला आहे. यांची मतं कोणाच्या पारड्यात पडली असतील हे अजिबातच गुपित नाही.