लोकसभा निवडणुकीच्या वातावरणातून आपण बाहेर पडतोय. तिकडे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं एनडीएच सरकार पण स्थापन झालंय. त्यामुळे देशभरात गेल्या तीन-चार महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उडालेला जो धुरळा होता तो आता खाली बसलेला आहे. पण इकडे महाराष्ट्रात मात्र चित्र काहीच वेगळं आहे. कारण चार महिन्याने विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत आणि तत्पूर्वी आत्ता राज्यातल्या चार विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये पुन्हा कुरबुर चालू झालेली आहे. त्यामुळे आम्ही जो परवा एक व्हिडिओ केलेला होता की महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडती आहे का काय ? त्याला या निवडणुकीच्या निमित्ताने आता कुठेतरी दुजोरा मिळत असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे.