पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात तिसऱ्यांदा सरकार बनवताना दिसतायत. तेलगू देशम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी मोदींना पाठींबा जाहीर केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे. पहील्या दोन टर्मच्या तुलनेत तिसऱ्या टर्ममध्ये भाजपाला कमी जागा मिळाल्यामुळे मोदींचे नाक कापल्याचा दावा उबाठा शिवसेनेचे नेते करतायत. वस्तूस्थिती नेमकी उलट आहे. कोकण, ठाणे आणि एमएमआर क्षेत्रात उबाठा शिवसेनेचा सुपडा साफ झाला आहे. सर्वाधिक जागा लढवून सुद्धा हा राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष झालेला आहे.