अशा जाहीराती पूर्वी लोकल रेल्वेच्या डब्यावर हमखास पाहायला मिळायच्या. शिउबाठाचे नेते संजय राऊत अलिकडे या बंगालीबाबांसारखी भाकीतं करत असतात. फेब्रुवारीत शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असे भाकीत त्यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळापासून अशा भाकीतांची जंत्री सादर करणारे राऊत हे शिउबाठाचे नेते, कार्यकारी संपादक आणि खासदार आहेत की पोपट घेऊन रस्त्यावर बसणारे भविष्यवेत्ते असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.