भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेते अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणाची इथून पुढची दिशा स्पष्ट केलेली आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर जवळीक साधनाऱ्यांना त्यांनी एक प्रकारे इशारा दिलेला आहे. महाराष्ट्रात आता भारतीय जनता पक्षाला कुठल्या गटाची किंवा कुठल्या एका संघटनेची पक्षाची युती करण्याची आवश्यकता नाही.