कोकणातील पालखी कोकणी माणसाची जीवाभावाची. कोकणी माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी पालखीला त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. ग्रामदेवतेच्या पालख्या गावागावात फिरत असतात आणि सगळीकडे एक वेगळेच जल्लोषाचे वातावरण असते. आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील नेवरे गावातील काजिरभाटीची पालखी अनुभवूया.