काँग्रेसचे कर्नाटकमधील नेते रमेशकुमार यांनी गांधी, नेहरू कुटुंबांमुळेच आपल्याला सगळे लाभ मिळाल्याचे वक्तव्य केले. त्याची तुलना महाराष्ट्रातल्या राजकारणाशी केली तर ठाकरे कुटुंबानेही आपल्या आमदार, खासदारांकडून अशीच अपेक्षा केली होती. पण या आमदारांनी ठाकरे कुटुंबाच्या चरणी लीन व्हायचे नाकारले आहे.