नावात काय आहे? असं शेक्सपिअरने म्हटले असले तरी नावात खूप काही असतं. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांची नावं बदलली आहेत. काही दिवसांपूर्वी इलाहाबादचे प्रयागराज तर फैजाबादचे अयोध्या असे नामकरण केले. आले. त्यांनी हा सिलसिला सुरूच ठेवला आहे. योगी सरकारचे हेच पॅटर्न शिंदे-फडणवीसांनी महाराष्ट्रात जोरदार राबवायला सुरुवात केली आहे.