निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांना तात्पुरते नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर निवडणूक चिन्ह मशाल देण्यात आलंय. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार असं चिन्ह मिळालंय. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर वेळ न दवडता काही प्रसारमाध्यमांनी दवंडी पिटायला सुरुवात केली. चिन्ह गोठवल्यामुळे आता उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळणार असा सूर आळवण्यात आला. या सहानुभूतीचा अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना फायदा होईल आणि भरभरून मतं मिळवून उद्धव ठाकरेंचा उमेदवार विजयी होईल, अशी भविष्यवाणीच त्यांनी करून टाकली.